तासवडे एमआयडीसीत चोऱ्या करणारे तीन संशयित तळबीड पोलीसांनी घेतले ताब्यात
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तासवडे एम.आय,डी.सी.मध्ये दि.०७ ते दि १० फेब्रुवारी रोजी दोन ठिकाणी चो-या झात्या होत्या. त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तळबीड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी के आर.भोसले यांना तपासाच्या सुचना दिल्या होत्या तपासाच्या दृष्टीने सी.टी.व्ही फुटेचच्या आधारे तांत्रिक तपास करून मंगळवार दि.१३ रोजी एम.आय.डी.सी मध्ये पेट्रालिंग करत असताना सी. सी. टी. व्ही फुटेच्या आधारे व गोपणीय बातमीव्दारा मार्फत चोरट्याची नावे निष्पत्र करुन पोलीसांनी संशयितांना ताब्यात घेतले.
या कारवाई संदर्भात तळबीड पोलीसांनी बुधवारी १४ रोजी माहिती दिली. एम. आय.डी.सी परिसरात स.पो.नि भोसले व हवालदार औबासे, भोसले, दिक्षीत, निलेश विभूते, कुंभार, प्रवीण फडतरे, राठोड, गायकवाड यांनी नंबर प्लेट नसलेल्या मोटार सायकल वरून ३ संशयीतांना कराड मोटर्स कंपनीचे पूर्व बाजूस जात असताना ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयितांची थांबवून चौकशी केली असता त्याच्या जवळ असलल्या पोत्याबाबत त्यांना क माहिती देत नव्हती. चौकशी दरम्यान त्यानी श्रेयश इंडस्ट्रीज येथे व सुएय फार्मुलेशन या दोन कंपनीत चोरी केली असल्याची कबुली दिली. त्याचे ताब्यातून दोन गुन्ह्यात चोरीस गेलेला तांब्याच्या क्लोजींग प्लेटा ,स्टेनलेस स्टील ब्रैकेट पट्टया ,जिओ कंपनीचा राऊटर असा एकूण ४६ हजार ५০०/- रूपयेचा मुद्देमाल हिरो होंडा कंपनीची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. तसेच संशयित बाल गुन्हेगार असल्याने त्यांच्या नातेवाईकाना बोलावून घेवून त्याच्या समक्ष समुपदेशन करण्यात आले आहे.