सोमवंशीय क्षत्रिय समाजाच्या जगदंबा मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात – changbhalanews
आपली संस्कृती

सोमवंशीय क्षत्रिय समाजाच्या जगदंबा मंदिराचा वर्धापन दिन उत्साहात

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
श्री सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज संस्थेच्या श्री जगदंबा मंदिराचा ११ वा वर्धापन उत्साहात साजरा करणेत आला. प्रत्येक वर्षी मिती माघ शु|| ५ या वसंत पंचमीस हा उत्सव साजरा केला जातो.

वर्धापन दिनानिमित्त समाजातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करणेत आलेले होते. सकाळी मुख्य मूर्तीस जलाभिशेख व दुग्धभिषेख करून उत्सवास प्रारंभ करणेत आला. त्यानंतर उत्सव मूर्तीची जगदंबा मंदिर ते गणपती मंदिर अशी वाजत गाजत सवाद्य मिरवणूक काढणेत आली. तसेच या उत्सवाचे औचित्य साधून “आयुष्यमान भारत” चा कॅम्प लावून समाज बांधवांना आरोग्य कार्ड काढून देणेत आले. सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते. अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव ,खजीनदार व सर्व ट्रस्टी व समाजबांधव यांनी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close