चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सिक्कीमचे माजी राज्यपाल, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांचा येत्या रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी असणाऱ्या आपल्या वाढदिवसानिमित्त ते कराड येथे उपस्थित राहणार नाहीत. तशी माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे.
खा.श्रीनिवास पाटील हे संसदेच्या अधिवेशनासाठी दिल्ली येथे असल्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छा स्विकारण्यासाठी त्यांच्या गोटे, कराड येथील निवासस्थानी ते उपस्थित असणार नाहीत. याची नोंद घेऊन कार्यकर्ते, हितचिंतकांनी प्रत्यक्ष भेटीसाठी येण्याचे टाळावे. तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत. शक्य असल्यास सामाजिक उपक्रमाद्वारे गरजूंना मदत करावी असे विनम्र आवाहन करण्यात आले आहे.