खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगदाचे बांधकाम डिसेंबर अखेर पुर्ण होणार – changbhalanews
राजकियराज्य

खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगदाचे बांधकाम डिसेंबर अखेर पुर्ण होणार

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची खासदार श्रीनिवास पाटील यांना ग्वाही

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
पुणे – सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील नवीन सहापदरी बोगदाचे बांधकाम प्रगतीपथावर असून हे काम यावर्षी डिसेंबर अखेर पुर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर दिली.

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या सहापदरीकरण कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच महामार्गावरील विविध सोयीसुविधांबाबत सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खा.श्रीनिवास पाटील यांनी रस्ते विकास मंत्रालयास अतारांकित प्रश्न विचारले.
यामध्ये खा.पाटील म्हंटले आहे, पुणे ते कागल या राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी कामाची सद्यस्थिती काय असून शेंद्रे-कागल विभाग आणि शेंद्रे-पुणे विभाग दरम्यान किती काम पूर्ण झाले आहे. तसेच कराडच्या कोल्हापूर नाक्यावरील उड्डाणपूलाचे बांधकाम सध्या  सुरू असून त्या कामाची गती वाढवावी. नागठाणे, पारगाव आणि वेळे येथील उड्डाणालाच्या काम, शिरवळ येथील ओव्हर ब्रिज, उंब्रज येथील उड्डाणपूल, खंबाटकी घाटाजवळील एस-टर्नच्या ठिकाणचे बांधकामे लवकर पूर्ण करून महामार्गावरून प्रवास करणार्‍या नागरिकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी केली.

त्यावर उत्तर देताना मंत्री नितीन गडकरी म्हणाले, कराड येथील उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असून त्याचे २७% काम पूर्ण झाले आहे. तर ऑक्टोबर २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. नागठाणे येथील अंडरपासचे काम हाती घेण्यात आले आहे. वेळे गावात उड्डाणपूल होणार आहे. खंबाटकी घाटातील सहापदरी दुहेरी बोगद्याचे बांधकाम येत्या डिसेंबर पर्यंत होणार आहे. तर पारगाव आणि शिरवळ येथील उड्डाणपुलाच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी डीपीआर करण्यात आल्याचे गडकरी यानी उत्तरामध्ये म्हंटले आहे. याशिवाय उंब्रज येथील पारदर्शक उड्डाणपूलासाठी खा.श्रीनिवास पाटील यानी ना.गडकरी यांना समक्ष भेटून त्याच्या पूर्णतः साठी विनंती केली आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close