आगाशिवनगर येथे पिस्टलसह एकास अटक
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर पोलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दल चांगलेच अलर्ट झाले आहे. बुधवारी मलकापूर ता. कराड येथील आगाशिवनगर परिसरात एकास पिस्टलसह फिरताना पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून जिवंत काडतुसेही हस्तगत करण्यात आली आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर यांनी आगामी निवडणुका व कराड शहराचा राजकीय इतिहास पाहता कराड शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील सो. यांना कराड शहरात बेकायदा शत्र, गावठी पिस्टल, कट्टे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्या अनुषगाने के. एन. पाटील यांनी पोलीस उप निरीक्षक पंतग पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे यांची सदर कामगीरी साठी एक विशेष पथक म्हणुन रचना केली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील बातमीदार मार्फत बातमी प्राप्त झाली की, आगाशिवनगर इमर्सन कंपनी जवळ एक संशयीत इसम देशी बनावटीचे पिस्टल विक्रीसाठी येणार आहे. त्याबाबत त्यांनी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील व पथकास माहिती देवून तात्काळ कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार सदर पथकाने आगाशिवनगर इमर्सन कंपनी शेजारी सापळा रचुन मिळाले बातमी प्रमाणे एक संशयीत इसम ताब्यात घेतला . त्याचेकडे अधिक चौकशी करुन अंगझडती घेतली असता त्याचे कंबरेला एक देशी बनावटीची मॅगझिन सह पिस्टल, गावटी कट्टा व जिवंत काडतुस असा एकुण 60 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला त्याबाबत कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री पतंग पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखा करीत आहेत.
लवराज रामचंद्र दुर्गावळे (वय 29 वर्षे रा. आगाशिवनगर मलकापुर ता. कराड जि. ) असे संशयीताचे नाव आहे. ही कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील, कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक पतंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक अझरूददीन शेख, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, पोलीस शिपाई अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे. महेश शिंदे, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.
82 गावठी कट्टे जप्त….
सातारा पोलीस दलाकडून नोव्हेंबर 2022 पासून आजपर्यंत 72 देशी बनावटीची पिस्तुले /कट्टे व 182 काडतुसे जप्त केली आहेत.