उंडाळे विभागात ‘या’ प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे झाले उद्घाटन – changbhalanews
Uncategorized

उंडाळे विभागात ‘या’ प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचे झाले उद्घाटन

खासदार श्रीनिवास पाटील यांचे प्रयत्न सार्थकी

चांगभलं ऑनलाइन | उंडाळे प्रतिनिधी
शेतकऱ्यांना पिकाची उत्पादकता व उत्पादन वाढीसाठी कृषिविषयक अद्ययावत माहिती मिळणे गरजेचे आहे. उंडाळे येथील बहूउद्देशीय कृषि प्रशिक्षण केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येईल. असा विश्वास व्यक्त करून माजी मंत्री स्व.विलासराव पाटील यांनी कायम लोकहितासाठी कार्य केले, असे प्रतिपादन राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केला.

उंडाळे ता.कराड येथे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बहूउद्देशीय कृषि प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, मंडल कृषी अधिकारी शितल नांगरे, उदयआबा पाटील, सचिन काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सारंग पाटील म्हणाले, सहकारी चळवळीला दिशा देणार्‍या स्व.विलासराव पाटील काकांच्या उंडाळे गावी खा.श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून हे काम होत असल्याचा आनंद आहे. ह्या दोन नेत्यांमध्ये ऋणानुबंध व अनोखे नाते राहिले आहे. स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पठडीत त्यांची जडणघडण झाली आहे. काकांनी लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडताना येथील सर्वसामान्य नागरिकाच्या हिताचा विचार केला. त्याचे प्रतिबिंब त्यांनी केलेल्या कामातून दिसून येते. अभ्यासपूर्ण व दूरदृष्टी ठेवून केलेल्या कामामुळे त्यांची नाळ येथील जनतेशी घट्ट जुळली गेली आहे.

प्रारंभी स्वागत दादासो पाटील यांनी केले आभार अजित कदम यांनी मानले. यावेळी मनोज डांगे, प्रमोद चौधरी, बाळासाहेब तोरणे आदींसह विभागातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close