पर्यावरण वन मंत्रालय आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी रोहन भाटे यांची निवड – changbhalanews
राज्य

पर्यावरण वन मंत्रालय आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी रोहन भाटे यांची निवड

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी

पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालय भारत सरकार, बिहार सरकार व बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी यांनी पटना बिहार येथे आयोजित केलेल्या दि. 5 ते 7 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या तीन दिवसीय दक्षिण आशियाई देश यांच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातून मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांची निवड झाली आहे. श्नी. भाटे हे या कार्यशाळेत ‘महाराष्ट्रातील वन्यजीव अपराध’ ह्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

 

वन्यजीवांची बेकायदेशीर शिकार , वन्य पक्षी व्यापार, संवर्धन आणि व्यवस्थापन या समस्यांवर विशेष चर्चा ह्या कार्यशाळेत होणार आहे. सदर कार्यशाळेत नेपाळ, श्रीलंका, अफगाणिस्थान, काझाकीस्थान, भूतान, बांगलादेश, म्यानमार, मंगोलिया ह्या देशातून तसेच भारतातील विविध राज्यातून अनेक तज्ञ सहभागी होणार आहेत.

 

ह्या कार्यशाळेत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय अनेक संस्था सहभागी होणार आहेत. बर्डलाईफ इंटरनॅशनल , विश्व प्रकृती निधी , इंटरनॅशनल युनियन फॉर कन्सर्वेशन ऑफ नेचर ,वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडीया , वेटलेंड इंटरनॅशनल, असोसिएशन फॉर काँझर्वेशन बायोडायव्हरसिटी आदी संस्थांचा त्यामध्ये सहभाग असणार आहे.

 

दरम्यान, या कार्यशाळेत निवड झाल्याबद्दल मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांचे राज्यातील विविध मान्यवरांनी तसेच वनविभागातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. कराड परिसरातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close