आरोग्यितातर्फे अनवानी विध्यार्थ्यांना शूज वाटप
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड तालुक्यातील पाचुंद,मेरवेवाडी, वाघेरी, कणसेमळा,चिंचमळा या ठिकाणाहून सदाशिवगड येथील यशवंत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यामंदिर हजारमाची, सदाशिवगड या शाळेत अनवानी येणाऱ्या विध्यार्थ्यांना ब्रँडेड कंपनीचे बूट आरोग्यीता चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने वाटप करण्यात आले.
अत्यंत माफक शैक्षणिक फी मध्ये शिक्षण देणाऱ्या सदाशिवगड येथील माध्यमिक विद्यामंदिर या शाळेत पाचुंद,मेरवेवाडी, वाघेरी,कणसेमळा,चिंचमळा, अशा भागात राहणाऱ्या गरीब विध्यार्थ्यांना अनवानी शाळेत यावे लागत होते. याबद्दल संस्थेचे शिक्षक राजू अपिने सर यांचेकडून माहिती मिळताच 25 जानेवारी रोजी त्या विध्यार्थ्यांना बूट वाटप केले. यावेळी उद्योजक सलीम मुजावर,गंगा आयुर्वेदचे अरविंद चव्हाण,ऍड.बी. बी. बनसोडे यांच्या हस्ते शूज वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक, गजानन देशमाने,शिक्षक राजगोंडा अपिने सर तसेच सर्व शाळेचे शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शरद गाडे यांनी आम्ही मदतीचा चिमणी सारखा वाटा उचलण्याचा प्रयत्न करीत आहोत असे म्हणाले तसेच सलीम मुजावर,अरविंद चव्हाण यांनी आपले मनोगत मांडत शाळेला इतर आवश्यक मदत करण्याचा शब्द दिला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गजानन देशमाने सरांनी केले सूत्रसंचालन राजगोंडा अपिने सरांनी केले व आभार अनिल जाधवसर यांनी मानले.