प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीकमध्ये कन्स्ट्रक्शन इन आर्किटेक्चर या विषयावरील वर्कशॉप उत्साहात
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
यशवंत विद्यापीठ कराड संचलित श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराड येथे एक दिवसीय Sustainable Construction in Architecture वर्कशॉप उत्साहात संपन्न झाले.
श्रीमती प्रेमलाताई चव्हाण पॉलिटेक्नीक कराड हे डिप्लोमा इन आर्किटेक्चर हा अभ्यासकम 1984 सालापासून चालविणारे महाराष्ट्रातील एकमेव तंत्रनिकेतन आहे. हे वर्कशॉप प्रिंसीपल आर्किटेक्ट पृथ्वीराज पवार, प्राचार्य स्वागत किणीकर यांचे प्रमुख उपस्थितीत व कोऑर्डीनेटर उन्मेषा किणीकर मॅडम, विभागप्रमुख ज्योती पाटील मॅडम, अधिव्याख्यात्या टोणपे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखालील राबविणेत आले. या वर्कशॉपला डिप्लोमा अर्किटेक्चर प्रथम वर्ष ते अंतिम वर्षामधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींनी उत्स्फुर्तपणे आपला सहभाग नोंदविला व ही कार्यशाळा यशस्वी होणेसाठी आपआपले योगदान दिले. आर्किटेक्ट पृथ्वीराज पवार यांनी या वर्कशॉपचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. आभार कोऑर्डीनेटर उन्मेषा किणीकर मॅडम यांनी मानले.