कराडला मंदिरांचा परिसर होतोय चकाचक!
कराड नगरपालिकेकडून महास्वच्छता अभियानाची अंमलबजावणी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड नगरपरिषदच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण 2024 व माझी वसुंधरा 4.0 अभियानांतर्गत मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली “स्वच्छ तीर्थ” आणि “डीप क्लिनिंग ड्राईव्ह” मोहिमे अंतर्गत कराड शहरातील मंदिर आणि मंदिरच्या आजूबाजूच्या परिसरात महास्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत कराड शहरातील सर्व मंदिरे पाण्याने स्वच्छ करून आजूबाजूचा परिसर साफसफाई करून स्वच्छ करण्यात येत आहे. गोळा केलेला कचरा घनकचरा व्यवस्थापन केंद्रावर त्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे. मंदिराचे कामकाज पाहणारे व्यक्ती यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येत असून मंदिर परिसर नेहमी स्वच्छ ठेवणेबाबत पालिकेकडून सांगण्यात येत आहे. या मोहिमेत शहरातील मंदिरांचा पारिसर चकाचक होत असल्याने परिसरातील नागरिकही या मोहिमेत सहभागी होत आहेत. या अभियनात नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी, तसेच सफाई कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे.
या अंतर्गत गुरुवारी श्री कृष्णामाई मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. शुक्रवारी श्री गणेश मंदिर, कमानी मारुती मंदिर, व इतर मंदिराच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली.