चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
: रयत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी अपूर्ण सभासद भागाची वाढीव दर्शनी रक्कम भरणा करून आपला सभासदत्वाचा हक्क व अधिकार सुरक्षित ठेवावा या बाबत काही सभासदांना अडचणी येत असतील तर त्यांनी साखर आयुक्त किंवा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहान कारखान्याचे माजी चेअरमन जयसिंगराव पाटील (बापू) यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अॅड. आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील -उंडाळकर उपस्थित होते.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. पाटील म्हणाले ६० वर्षापूर्वी या विभागात एकमेव कृष्णा सहकारी साखर कारखाना होता त्यानंतर सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली त्यावेळी सर्व ऊस उत्पादकांना न्याय देता येत नव्हता या पार्श्वभूमी वर कै. विलासराव पाटील (काका) यांच्या प्रयत्नाने डोंगरी भागामध्ये साखर कारखाना उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या सुरवातीला कोळेवाडीच्या माळावर कारखान्यासाठी जागा निवडण्यात आली मात्र तत्कालीन हवाई अंतराच्या नियमामुळे ती जागा रद्द झाली त्यानंतर टाळगाव च्या माळावर कारखाना उभारणीसाठी काही जागा खरेदीही करण्यात आली मात्र तेथेही हवाई अंतराचा प्रश्न निर्माण झाल्याने शेवटी शेवाळेवाडी (म्हासोली) च्या काहीशा प्रतिकूल ठिकाणी जागा निश्चित झाली १९९६ ला कारखान्याला इरादा पत्र मिळाले त्याच वर्षी नोंदणी झाली १९९८ ला परवाना मिळाला कारखान्यासाठी १५० एकर क्षेत्र खरेदी करण्यात आले जागा संपादना वेळी खूप संघर्ष करावा लागला त्यातून काटकसरी ने व खडतर प्रयत्नांनी ४० ते ४५ कोटी मध्ये अवघ्या १३ महिन्यात कारखान्याची उभारणी पूर्ण केली कारखान्याबाबत वरिष्ठ पातळीवरील कार्यालयीन कामे काकांच्या माध्यमातून तर प्रत्यक्ष साईट वरील कामे मी स्वतः पूर्ण करून घेत होतो कराड पाटण तालुक्यातील ८५ गावांचे कार्यक्षेत्र कारखान्याला आहे सुरवातीलाच कमी ऊस क्षेत्र, पाण्याची कमतरता, लोकरी मावा यामुळे कारखान्याला अनेक अडचणी येत होत्या अशा खडतर परिस्थितीत १६ / ११ / २००१ ला चाचणी हंगाम घेतला व २८ / ११ / २००१ ला पहिल्या गळीत हंगामाची साखर बाहेर पडली त्यानंतर कारखाना कार्यस्थळावर पेट्रोल पंप तसेच कार्यक्षेत्रात छोटे मोठे बंधारे, वाकुर्डे बुदूक योजना, हनुमान पाणी पुरवठा योजना ( कासारशिरंबे ) राबवून ऊस क्षेत्र वाढवण्याचा यशस्वी प्रयत्न केला पुढे १० वर्षे चेअरमनपदाची जबाबदारी सांभाळली सध्या साखर आयुक्तांच्या आदेशाने सभासद भागाची वाढीव दर्शनी रक्कम भरून भाग पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत कारखान्याने सभासदांना नोटिसी द्वारे कळवले आहे . मात्र काही सभासदांना नोटीस प्राप्त झालेल्या नाहीत, त्यांनी त्या प्राप्त करून घ्याव्यात व आपली शेअर्सची वाढीव दर्शनी रक्कम भरणा करून आपला सभासदत्वाचा हक्क व अधिकार अबाधित ठेवावा या बाबत काही अडचणी येत असतील तर उपनिबंधक सहकारी संस्था किंवा साखर आयुक्त यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही जयसिंगराव पाटील यांनी केले आहे.