कराडशी नातं जडलेल्या अधिकाऱ्याची जेंव्हा बदली होते…. – changbhalanews
आपली संस्कृतीक्राइम

कराडशी नातं जडलेल्या अधिकाऱ्याची जेंव्हा बदली होते….

हो, ‘कराडशी नातं जडलेल्या अधिकाऱ्याची जेव्हा बदली होते’ असं मुद्दामहून सांगावं वाटतं. कारण कराडशी नातं जडणं तशी साधी आणि सोपी तर मुळीच गोष्ट नाही. तसं तर आम्ही कराडकर सुजाण. चांगल्याची पाठराखण करतोच करतो पण वाईटाच्या पाठीत बडगा हाणतो. मग मग क्षेत्र कोणतेही असो. त्यामुळेच कराडकरांची ज्याने मने जिंकली त्याने अवघा महाराष्ट्र जिंकलाच समजा!. त्यात पोलीस दलातील एखाद्या अधिकाऱ्याच्याबाबत असं घडणं म्हणजे आणखी दुरापास्त. पण ही किमया आपल्या कर्तव्यातून साध्य केलीय कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी. तीही अवघ्या सहा महिन्यात.

‘पीएसआय राजू डांगे, गुन्हे प्रकटीकरण तथा डीबी शाखा कराड शहर’ ही त्यांची ओळख कराडकरांसाठी पुरेशी आहे. हे नाव ऐकलं की सुजाण नागरिकांना दिलासा वाटतो आणि गुंडा-पुंडांच्या मनात धडकी भरते. तसं तर या अधिकाऱ्याचा स्वभाव शांत आणि तितकाच संयमी. अगदी मेणाहुनी मऊ म्हणा. पण वेळ पडली की वज्राहुनी कठोर. त्याची चुणूक आम्ही गेल्या सहा महिन्यात जवळून पाहिली आहे. तसा कराड तालुक्यात जवळपास तीन वर्षाचा कालावधी त्यांचा पूर्ण झाला आहे. पण त्यांच्या कार्यतत्परतेला वाव मिळाला तो गेल्या सहा महिन्यात कराड गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कामकाजाच्या निमित्ताने.

कराडची गुन्हेगारी पश्चिम महाराष्ट्रात केंद्रस्थानी असते. गँगवार मधून दिवसा ढवळ्या पाडणारे मुडदे कराडकर 2009 पासून ते आत्तापर्यंत अनेकदा पाहत आले आहेत. त्यामुळे इथले गुन्हेगार त्यांच्या टोळ्या याविषयी वेगळे सांगायला नको पण त्यांच्यावर वचक ठेवायचं काम खऱ्या अर्थाने करते ती कराड शहर पोलीस ठाण्याची गुन्हे प्रकटीकरण शाखा. आजवर अनेक चांगल्या आणि पोलीस दलात नाव असलेल्या अधिकाऱ्यांनी या शाखेचा कार्यभार पहायला आहे. आणि स्वतःची वेगळी छाप ठेवून ते आज राज्याच्या विविध भागात कर्तव्य बजावत आहेत. हेच काम अवघ्या सहा महिन्यात पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांनी करून दाखवलं आहे. कराडमध्ये दिवसाढवळ्या फिरत दहशत माजवणाऱ्या पाच ते सहा पिस्तूल बाजांना त्यांच्याकडील पिस्तुलासह त्यांनी गजाआड केलं. व्यसनात भरकटत चाललेली पिढी वाचवण्यासाठी त्यांनी गांजा पकडण्याच्या अनेक कारवाया केल्या. हातोहात दुचाकी लांबवणाऱ्या दुचाकीचोरांना गजाआड करून 15 ते 20 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या. नामांकित गुंडांना तडीपार करण्यात मोठी भूमिका बजावली. सांगण्यासारखे अशा कितीतरी कारवाया आहेत. आम्ही बातमीमध्ये कधी त्यांना राजू डांगे, कधी राज डांगे तर तर कधी आर. एल. डांगे या नावाने संबोधलं. पण तक्रार नाही, ‘कामगिरी महत्त्वाची’ असं त्यांचं म्हणणं. असो, आज कराडमध्ये वेगळी छाप ठेवून हा अधिकार बोलीवर सोलापूरला चाललाय… त्यांना ‘चांगभलं न्यूज’कडून भरभरून शुभेच्छा!! निरोपाच्या क्षणी पीएसआय डांगे साहेब हळवे झालेत. भावुक झालेत, कराडकरांच्याबाबत त्यांना वाईट अनुभव ही नक्की आले असतीलच. पण माणसाने चांगलं ते घ्यावं.. चांगल्याची पाठराखण करावी आणि चांगल्याच्या कौतुकासाठी चार शब्द खर्ची करावं असं म्हटलं जातं. निरोपाच्या क्षणी डांगे साहेब यांनी पाठवलेल्या पर्सनल व्हाट्सअप मेसेज मध्ये असंच काही आहे. ते त्यांच्याच शब्दांत….

“मी PSI राज डांगे गेली अनेक वर्षे कराड तालुका आणि ग्रामीण भागातील आउट पोस्ट मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होतो… यापैकी माझ्या आयुष्याला व मी करत असलेल्या कर्तव्याला ऊर्जारुपी कलाटणी मिळाली ती कराड शहर पोलिस ठाण्यामध्ये…. कराड शहर पोलिस ठाण्यामध्ये कर्तव्य बजावत असताना सर्व सहकारी स्टाफ व कर्मचारी यांची स्नेहाची व विश्वसनीयतेची साथ लाभली…. कराड तालुक्यात असंख्य कारवाया केल्या त्यामुळे प्रशासनाने अनेक प्रशंसनीय कार्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले… माझी अनेक वर्षाची कारकीर्द ही आपल्या कराड तालुक्यात झाल्याने मोठ्या प्रमाणात मित्रपरिवार निर्माण झाला.. या निर्माण झालेल्या अलोट मित्रपरिवाराचा एकच त्रास मला होतो आहे तो म्हणजे त्यांना सोडून इतर शहरामध्ये जाण्याचा.. जरी मी देशाच्या कोणत्याही कोपर्‍यामध्ये कर्तव्य बजावीत असलो तरी तुमच्या या सहकार्याचा अखेरपर्यंत ऋणी राहीन.. व आपल्या प्रत्येक हाकेला तत्परतेने हजर असेन हे मी आपणा सर्वांना वचन देतो.. तुमच्या सोबत घालवलेले स्नेहाचे आणि आपुलकीचे क्षण मला हे शहर सोडू देत नाही पण पोलिस प्रशासनात बदली प्रक्रिया ही अटळ आहे.. त्यापासून कोणीही वाचू शकत नाही त्याच प्रक्रियेतून मलाही जावे लागत आहे याचीच खंत फार वाटते..
देशसेवा करत असताना माझ्या सहवासातील अनेकांनी मला मोलाची व महत्वपूर्ण अशी मदत केली ते मी आयुष्यभर विसरणार नाही..
माझा कराड दौरा आपली भेट नक्की घालून देईल आणि केंव्हाही आणि कधीही आताचे आधुनिक तंत्रज्ञान (मोबाईल) आपल्याला नेहमी संपर्कात ठेवील हे नक्की….
आपला सहवास व मला लाभलेले प्रेम मनामध्ये साठवून अतिशय भावूक अंतःकरणाने निरोप घेतो..
आणि आपण केलेले सहकार्य सदैव स्मरणात राहील अशी ग्वाही देतो..

धन्यवाद…………….”

हैबत आडके, 9404352637 संपादक, चांगभलं न्यूज.

टीप – आपण संपर्क करून पीएसआय राजू डांगे यांना 9552522552 या नंबरवर शाबासकी आणि शुभेच्छा देऊ शकता.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close