घारेवाडी येथे युवा ज्ञान यज्ञास आरंभ,२३व्या युवा हृदय संमेलनास मोठ्या उत्साहात प्रारंभ
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
स्वामी विवेकानंद जयंती आऊचीत्या साधून शिवम अध्यात्मिक आणि सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान घारेवाडी आयोजित बलशाली युवा हृदय संमेलनास आज शुक्रवारी प्रारंभ झाला आहे. हे तेविसावे युवा हृदय संमेलन आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत आज मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले.नागपूर येथील सर्वश्रेष्ठ दिव्यांग पुरस्कृत प्रसिद्ध उद्योगपती मा. जयसिंगराव चव्हाण , मा.इंद्रजित देशमुख, शिवम अध्यक्ष राहुल पाटील,मधुकर सावंत, आनंदराव मोरे,आशितोष गोडबोले, आयकर अधिकारी जयवंत चव्हाण, मधुकर सावंत, दत्तात्रय पवार, प्रताप कुंभार, धनंजय पवार, विश्वनाथ खोत, महेश मोहिते, प्रताप भोसले, देवेंद्र पिसाळ, सलिम मुल्ला, अशोक सावंत, डॅा. प्रकाश शिंदे, अशोक सस्ते, प्रविण दाभोळे श्री. प्रभावळे यासह प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
सकारात्मक विचारांसमवेत जिद्द ठेवा. कुटुंबाला प्राधान्य द्या. बिन पंखांची गरुड भरारी या विषयावर बोलताना जयसिंग चव्हाण यांनी पुढे सांगितले. पैशापेक्षा माणूस महत्वाचा आहे.जीवनाकडे सकारात्मक तेने बघा.उद्योग करून रोजगार देणारे बना.कुठल्या गोष्टी त खचू नका.मानसिक दृष्टया. स्वावलंबी बना. खच नाऱ्या वेळेला खंबीर उभे रहा. असे मोलाचे मार्गदर्शन युवकांना दिले. दीव्यांग असूनही अवघ्या २००रुपयात कोट्यवधीचा उद्योग उभा करणारे जयसिंगराव चव्हाण यांच्या जीवन पटाचा उलगडा पाहून तरुणाई भारावली.
८७ टक्के माझ्यात दिव्यांगत्व आहे. १३ टक्केच जीव आहे. ऊर्जा मात्र शंभर टक्के भरली आहे. आजही मी कार ड्रायव्हींग करतो. जहाज चालवतो. स्वीमिंग करतो. माणसाने काही न करता काहीतरी सतत करत राहिले पाहिजे. असे सांगताना श्री. चव्हाण पुढे म्हणाले, तुम्ही पण जे कराल ते पुर्ण ताकदीने करा. आत्मविश्वास अणि जिद्दीने
करा. पैशापेक्षा जीवाभावाचे नांते जपत रहा. घेणाऱ्यापेक्षा देणारे हात तुम्ही बना. रोजगार मागण्यापेक्षा रोजगार देणारे तुम्ही व्हा, असे आवाहन यावेळी त्यांनी शिबीरार्थीना केले.
शिवम् संस्थापक इंद्रजीत देशमुख, प्रतिष्ठान अध्यक्ष राहूल पाटील, पाटबंधारे अभियंता आनंद मोरे, अशुतोष गोडबोले, आयकर अधिकारी जयवंत चव्हाण, मधुकर सावंत, दत्तात्रय पवार, प्रताप कुंभार, धनंजय पवार, विश्वनाथ खोत, महेश मोहिते, प्रताप भोसले, देवेंद्र पिसाळ, सलिम मुल्ला, अशोक सावंत, डॅा. प्रकाश शिंदे, अशोक सस्ते, प्रविण दाभोळे श्री. प्रभावळे यासह प्रतिष्ठान विश्वत व राज्याच्या विविध जिल्ह्यातून आलेले शिबीरार्थी यावेळी उपस्थीत होते.
उद्घाटनाच्या पुढच्या सत्रात अनघा मोडक यांनी जगण्याचे गाणे होताना या विषयावर बोलताना युवकांशी हितगुज केले. प्रास्ताविक अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले. हजारो युवक युवतीची उपस्थिती. सूत्रसंचालन विठ्ठल मोहिते यांनी केले.आभार युवराज पाटील यांनी मानले.
संमेलनात उद्या….
सत्र एक विजय कुलंगे (आयएएस ओडिसा केडर)
विषयः संघर्षाची यशस्वी गाथा
सत्र दोन प्रसाद गावडे ( कोकणी रान माणुस )
सत्र तीन जेष्ठ नेत्रतज्ञ तात्याराव लहाणे
स्वप्न बघा स्वप्न बघा
सत्र चार श्रीमती शांताबाई यादव ( पुरूषासाठी सलून चालवणारी पहिली स्त्री )
विषयः अबला नाही मी, सबला आहे मी
देशभक्तीपर गिताचा कार्यक्रम ( जागो हिंदुस्थांनी )