कराड उत्तरचे युवा नेते रामकृष्ण वेताळ यांचा बुधवारी वाढदिवस
विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सातारा लोकसभा मतदार संघाचे समन्वयक व
भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दि १० जानेवारी रोजी कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ नंतर रामकृष्ण वेताळ हे कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी सुर्ली ता. कराड येथील निवासस्थानी उपस्थित राहणार आहेत.
युवा नेते रामकृष्ण वेताळ यांच्या वाढदिवसानिमित्त रामकृष्ण वेताळ युवा मंच कराड उत्तरच्या वतीने सुर्ली ता. कराड येथे बुधवारी सकाळी ९ वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सुसाईनाथ गोपालन संस्था येथे गाईंना चारा वाटप केले जाणार आहे.
यानंतर नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड प्रीतिसंगम येथील समाधीला आदरांजली वाहून ते सकाळी १० वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कराड कार्यालयाला सदिच्छा भेट देणार आहेत. उंब्रज येथील जागृती आश्रमशाळा येथील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन , पाल ता. कराड येथील श्री खंडोबा देवाचे दर्शन घेऊन पाल येथील योगेश्वर सामाजिक संस्थेच्यावतीने रामकृष्ण वेताळ यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे.
त्यानंतर वळसे ता. जि. सातारा येथील एहसास मतिमंद शाळा येथे फळ वाटप, तसेच नागझरी ता. कोरेगाव येथील संत रोहिदास आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेहभोजन समारंभ होणार असून दुपारी ३ वाजता सुर्ली ता. कराड येथील निवासस्थानी शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती रामकृष्ण वेताळ युवा मंचच्यावतीने देण्यात आली आहे.