मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांचा मंगळवारी वाढदिवस
विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
मलकापूर पालिकेचे उपनगराध्यक्ष, कराड दक्षिण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा सभापती, आरोग्य, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती मनोहर भास्करराव शिंदे यांचा ९ जानेवारीला वाढदिवस संपन्न होत आहे. यानिमिपत्त ९ जानेवारीपर्यंत मनोहर शिंदे मित्रपरिवार यांच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मनोहर शिंदे सोमवारी दि.८ रोजी लक्ष्मीनगर या ठिकाणी गांधी फॉडेशन, कराड व सह्याद्री सुपर स्पेशालिटी
हॉस्पिटल यांचेवतीने आयोजित आरोग्य शिबीराचे आयोजन केले असून, सदरचे आरोग्य शिबीरामध्ये गरोदर माता तपासणी, नेत्र तपासणी, रक्तातील साखर व रक्तदाब तपासणी तसेच ई.सी.जी. इत्यादी तपासण्या सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या वेळेत करण्यात येणार आहेत.
मंगळवार, दि. ९ रोजी ९.३० वाजता मदरसा जियाउल कुरआन, प्रितीसंगम मंगल कार्यालयाजवळ येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळ वाटप पालिकेच्या नगराध्यक्षा निलम येडगे, नगरसेविका नंदा व अलका जगदाळे यांचे हस्ते करण्यात येणार आहे. तसेच सकाळी साडेदहा वाजता बालसुधारगृह केंद्र शास्त्रीनगर येथे बांधकाम सभापती राजेंद्र यादव, सभापती प्रशांत चांदे, नगरसेविका गितांजली पाटील यांचे हस्ते शैक्षणिक साहित्य व फळ वाटप करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता द.शि. एरम मुक-बधीर विद्यालय सैदापूर येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व फळ वाटप माजी नगराध्यक्ष मोहन शिंगाडे व नगरसेवक नारायण रैनाक यांच्या हस्ते होणार आहे.
मंगळवारी वाढदिवसानिमित्त गो.का.क. सहकारी पाणीपुरवठा कार्यालय या ठिकाणी दुपारी १.०० नंतर मनोहर शिंदे हे शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
मलकापूर मधील सर्व मित्र परिवार व हितचिंतक यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन नगराध्यक्षा निलम येडगे व राजेंद्र यादव यांनी केले आहे.