ढेबेवाडी येथील खून प्रकरणी तिघांना अटक – changbhalanews
क्राइम

ढेबेवाडी येथील खून प्रकरणी तिघांना अटक

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व ढेबेवाडी पोलिसांची कामगिरी

चांगभलं ऑनलाइन | ढेबेवाडी
जुन्या भांडणाच्या कारणावरुन डोक्यात दगड घालून कुसूर ता. कराड येथील एकाचा ढेबेवाडी येथे खून केल्याप्रकरणी तीन संशयीत आरोपीना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व ढेबेवाडी पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि.१८ डिसेंबर २०२३ रोजीचे रात्रौ ९.३० वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी ता. पाटण जि. सातारा येथील उमा महेश बारमध्ये ऋतुराज दिलीप देशमुख, रा. कसुर ता कराड जि सातारा यास वैभव काळे, उमर मुल्ला, शुभम खेडेकर यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन ऋतुराज याच्या डोक्यात दगड घालुन त्यास जखमी करुन त्यास गंभीर दुखापत पोचवुन खुन केला होता. याबाबत ढेबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी पाटणे पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी व उपनिरीक्षक पतंग पाटील (स्थानिक गुन्हे शाखा) व त्यांचे पथकास तात्काळ गुन्हयाचे घटनास्थळी जावून गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे नमुद पोलीस अधिकारी, अंमलदार तात्काळ घटनास्थळी रवाना झाले.

त्यानंतर उपाधीक्षक विवेक लावंड यांनी अधिकारी अंमलदांचे स्वतंत्र तपास पथके तयार करुन त्यांना प्राप्त फुटेजमधील, संशयीत इसमांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेण्याचा सुचना दिल्या. नेमलेल्या पथकाने घटनास्थळा जवळील व आजूबाजूचे परिसरातील साक्षीदार लोकांचेकडे विचारपूस केली. त्यातून तीन संशयीतांची नावे समोर आली.

पोलिसांनी संशयतांचा शोध सुरू केला. तपास पथकांना या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे पुणे बाजुकडे गेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांच्या पथकाने पुणे येथे सापळा रचून तीन्ही संशयीतांना शिताफिने ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी ऋतुराज दिलीप देशमुख, रा. कसुर ता कराड जि सातारा याचेबरोबर जुन्या भांडणाच्या कारणावरुन वाद असल्याने त्याच्या डोक्यात दगड घालून खुन केला असल्याची कबुली पोलिसांना दिली.

सदरचा गुन्हा उघडकीस आणून संशयितांना अटक करण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, तसेच पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस अंमलदार मोहन नाचन, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्ला, शिवाजी भिसे, केतन शिंदे, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन, चालक विजय निकम तसेच ढेबेवाडी पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार विकास सपकाळ, प्रशांत चव्हाण, अजय माने, प्रशांत चव्हाण, संताजी जाधव, माणिक पाटील, प्रशांत माने, सौरभ कांबळे, सरिता पवार कराड शहर पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार शशिकांत काळे, कुलदीप कोळी, संतोष पाडळे यांनी तसेच सायबर विभागाचे अजय जाधव, अमित झेंडे यांनी सदरची कारवाई केलेली आहे . कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी अभिनंदन केलेले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close