मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ तरुणांनी घ्यावा- रविंद्र साठे
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
राज्यातील युवक-युवतींनी नोकरी करण्याऐवजी स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरू करून रोजगारदाते व्हावे, या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे चेअरमन रवींद्र साठे यांनी शंकर पावशे यांना इलेक्ट्रिक वाहन प्रदान करून रोजगाराची नवीन संधी उपलब्ध केली. यासाठी बँक ऑफ इंडिया मलकापूर (ता.कराड) शाखेच्यावतीने शंकर पावसे (रा.जखिणवाडी) यांना इलेक्ट्रीक भाजीपाला वाहतुक गाडीसाठी अर्थसहाय्य मंजुरी केले गेले आहे.
यावेळी साठे म्हणाले, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा लाभ तरुणांनी घ्यावा, सरकारी योजना या युवकांसाठी असून त्याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा.
यावेळी पावशे यांना महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ मुंबईचे चेअरमन रविंद्र साठे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी बिपीन जगताप यांच्या हस्ते चाव्या देण्यात आल्या. यावेळी दिलीप साळुंखे (वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ), खबाले, पवार, पाटील, वास्के आदी उपस्थित होते.