‘जनकल्याण’च्या, सरस्वती शैक्षणिक संकुलाने साकारला जिल्ह्यातील पहिला सांडपाणी प्रकल्प
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
येथील जनकल्याण प्रतिष्ठानच्या सरस्वती विद्यामंदिर व विद्यालय कराड या विद्यालयाने शाळेत तयार होणारे टॉयलेट, बाथरूम, किचन यामधून बाहेर पडणारे सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुनर्वापर गार्डनसाठी केला आहे. जलप्रदूषणाबाबत घेणारी काळजी व पर्यावरण संरक्षणाचा विचार करणारी जिल्ह्यातील ही पहिलीच शाळा ठरली आहे.
सिवेज ट्रीटमेंट प्लांट (एसटीपी) हा प्रकल्प मे.नेचर्स अँड केअर, सायंटिफिक सोल्युशन या कंपनीच्या माध्यमातून विद्यालयाने परिसरात उभा केला आहे. यामध्ये एरोबिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. सुमारे दहा हजार लिटर पाणी दिवसाला शुद्ध केले जाते.
या प्रकल्पाचा शुभारंभ दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी
जसविंदर नारंग (कार्यकारी अधिकारी, सायरस पूनावाला) व जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष गोडबोले यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सचिव अनिल कुलकर्णी, राजेश काळे, श्रीपाद कुलकर्णी, विजय कोल्हटकर, रोहित शिंदे, विजय कुलकर्णी, नेचर्स अँड केअर कंपनीचे अध्यक्ष जालिंदर काशीद व व सहकारी मोठया संख्येने उपस्थित होते.