चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील मलकापुर ता. कराड येथील कृष्णा हॉस्पीटल समोरून अॅपे रिक्षा चोरी करणा-यास कराड शहर पोलीस ठाणेचे डी.बी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक आर.एल.डांगे सो व त्यांच्या पथकाने अॅपे रिक्षासह ताब्यात घेतले.
याबाबतची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, वरीष्ठ पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी यांचे आदेशाने पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे व पथक हे पोलीस ठाणे हद्दीत मोटर सायकल चोरी रोखने व शोध घेणेकामी गस्त करत असताना एक इसम संशयास्पदरित्या शिवाजी स्टेडियमचे समोर अॅपे रिक्षा लावुन रिक्षामध्ये बसलेला दिसला. सदर इसमास पोलीस उपनिरीक्षक आर. एल. डांगे व पथकाने ताब्यात घेवुन अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव जावेद दस्तगीर महाबरी रा. आटके ता. कराड जि.सातारा असे सांगितले. त्याचे ताब्यातील अॅपे रिक्षाबाबत अधिक चौकशी केली असता सदरची अॅपे रिक्षा (१ लाख ६० हजार रूपये किमतीची) ही कृष्णा हॉस्पीटल येथुन चोरी केल्याचे कबुल केले. याप्रकरणी जावेद दस्तगीर महाबरी रा. आटके ता. कराड जि. सातारा यास पोलिसांकडून ताब्यात घेणेत आले आहे. सदर संशयित आरोपी हा पोलीस रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेवर आजपर्यत अनेक चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हयाचा तपास हवालदार अमोल साळुंखे हे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी , कराड शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक आर. एल. डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, देवकुळे , हवालदार शशिकांत काळे, हवालदार संतोष पाडळे, कुलदिप कोळी, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केली आहे.