
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद शिंदे यांची तर लोकसभा सोशल मीडिया संयोजकपदी शैलेंद्र गोंदकर यांची भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी नियुक्ती केली. जिल्हाध्यक्ष कदम यांच्या हस्ते शिंदे व गोंदकर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी धैर्यशील कदम म्हणाले, सातारा जिल्ह्यात भाजपच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या सर्व समावेशक अशा निवडी करण्यात आल्या आहेत. नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची भूमिका, ध्येयधोरणे जिल्ह्यात तळागाळापर्यंत जनतेमध्ये पोहोचवावीत. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रात सर्वाधिक जागा निवडून येतील. यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे, असे आवाहन धैर्यशील कदम यांनी केले.
यावेळी जिल्हाअध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सध्या सोशल मीडियाचा जमाना असल्याचे सांगून भारतीय जनता पार्टी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा योग्य वापर करून सातारा लोकसभेची जागा मताधिक्याने निवडून आणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळेस नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, खा. श्री.छ. उदयनराजे भोसले, आ. श्नी. छ. शिवेंद्रसिहंराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, प्रदेश सचिव भरत पाटील, लोकसभा प्रभारी अतुल भोसले, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, लोकसभा संयोजक सुनील काटकर, लोकसभा समन्वयक रामकृष्ण वेताळ, माजी आ. मदनदादा भोसले, प्रियाताई शिंदे, मनोज घोरपडे, सरचिटणीस सागर शिवदास, विठ्ठल बलशेटवार, सुनील शिंदे, जयकुमार शिंदे, संतोष कणसे, सातारा जिल्हा सोशल मीडिया संयोजक रविंद्र लाहोटी, जिल्हा संवादक प्रविण शहाणे, कराड अध्यक्ष एकनाथ बागड़ी, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, विश्वनाथ फूटाणे तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.