भाजपाचा अश्वमेध तीन राज्यात उधळतोय, मोदी मॅजिक अजूनही सुरूच – changbhalanews
राजकियराज्य

भाजपाचा अश्वमेध तीन राज्यात उधळतोय, मोदी मॅजिक अजूनही सुरूच

कराड उत्तर भाजपाने मिठाई वाटून साजरा केला आनंद उत्सव

चांगभलं ऑनलाइन | हैबत आडके
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या देशातील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाचा अश्वमेध कोणीही रोखू शकलेला नाही. तीन राज्यांमध्ये यश मिळवून देशाचा विकास फक्त भाजप करू शकते, हे या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप निर्विवाद बहुमत मिळवून नरेंद्र मोदीची तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, तर महाराष्ट्रातही देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास भाजपा सातारा लोकसभा समन्वयक व भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांनी व्यक्त केला.

देशात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मध्यप्रदेश सह काँग्रेस शासित राजस्थान व छत्तीसगड या तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या दणदणीत विजयानिमित्त कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्यावतीने सैदापूर येथे भाजपा सातारा लोकसभा समन्वयक व भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या सैदापूर-विद्यानगर येथील संपर्क कार्यालयासमोर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी भाजपा सातारा लोकसभा समन्वयक व किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ पत्रकारांशी बोलत होते. भाजपा कराड उत्तर तालुका अध्यक्ष शंकरराव शेजवळ, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, सुरेश कुंभार, महिला आघाडीच्या दिपालीताई खोत यांच्यासह शेकडो भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी रामकृष्ण वेताळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरात भाजपाने विजयाचा महामेरू सुरू ठेवला असून आगामी लोकसभेच्या ऐतिहासिक विजयासाठी ही नांदी ठरली आहे. भारतीय जनता पार्टीच्या आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्यासाठी हा विजय म्हणजे नवी प्रेरणा मिळाली आहे. आगामी सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सह सातारा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते आता सज्ज झालो आहोत.

महाराष्ट्रामध्येही भाजपचे सरकार येणार…

पाचपैकी तीन राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा विजयी करून गेला आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मोदी मॅजिकच चालणार आहे. अनेकांची सत्ता आणि संस्थाने या निवडणुकीमध्ये उध्वस्त होणार आहेत. निष्क्रिय राज्यकर्त्यांना जनता खड्यासारखी वेगळी करणार आहे.
रामकृष्ण वेताळ, भाजपा सरचिटणीस, किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश.

तीन राज्यांत भाजपला बहुमत….

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे, तर तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळाले आहे.
राजस्थानमध्ये भाजपला ११५ जागा, काँग्रेसला ६९ जागा, मध्य प्रदेशात भाजपला १७६ जागा, काँग्रेसला ६२ तर छत्तीसगडमध्ये भाजपला ५६ आणि काँग्रेसला ३४ जागा मिळणार असल्याचे दिसत आहे.

पंतप्रधानांनी सोशल मीडियावर मांडले जनतेचे आभार….

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधानसभा निवडणुकात भाजपला घवघवीत यश मिळवून दिल्याबद्दल सोशल मीडियावर जनतेचे आभार मानले आहेत.

 

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close