Uncategorized
पुण्यतिथीनिमित्त महात्मा फुले यांना जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांनी केले अभिवादन

सातारा | जिमाका
स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर भारतीय समाजसुधारक,क्रांतीकारी विचारवंत महात्मा जोतीराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलिस अधिक्षक समीर शेख यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
समाजातील विविध क्षेत्रातील विषमता,अंधश्रध्दा यावर कठोर प्रहार करुन समतेचा, सत्याचा, विवेकाचा आणि स्त्री शिक्षणाचा संदेश देणाऱ्या महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी खटाव तालुक्यातील कटगुण येथे महात्मा फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला हार घालून अभिवादन केले.