श्रीराम अक्षता गुरुवारपर्यंत दर्शनासाठी कराडात
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
श्री राम जन्मभूमी, अयोध्या येथे निर्माण होत असलेल्या भव्य मंदिरात दिनांक २२ जानेवारी २०२४ रोजी ४९२ वर्षानंतर रामललाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्याअंतर्गत पवित्र श्रीराम अक्षदा कराडमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
अयोध्योत श्रीरामललाच्या सानिध्यात मंत्रोच्चाराने पवित्र केलेल्या अक्षता संपूर्ण देशात प्रत्येक गावात, प्रत्येक घरात निमंत्रण देण्याचे संपर्क अभियान सुरू आहे. त्याअंतर्गत अयोध्यातील पवित्र श्रीराम अक्षता कृष्णा-कोयनेच्या पवित्र प्रितीसंगमावर वसलेल्या तीर्थक्षेत्र कराड नगरीतील श्नी गणपती मंदिर, तेल्ली गल्ली, शनिवार पेठ, कराड या ठिकाणी गुरूवार दि. ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत दर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. तरी सर्व कराडकरांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कराड नगरीतील मानाचा पहिला गणपती श्री गजानन नाट्य मंडळ ट्रस्टकडून करण्यात आले आहे.