Uncategorized
किवळला ‘या’ कामासाठी झाला ३३ लाखांचा निधी मंजूर
युवा नेते जशराज पाटील यांनी केली पाहणी
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने वखार महामंडळाच्या सीएसआर फंडातून किवळ ता. कराड येथे तालीमगृह बांधणे या कामासाठी ३३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदरचे काम लवकरच सुरू होणार असून जेथे बांधकाम होणार आहे, त्या जागेची पाहणी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक, युवा नेते जशराज पाटील यांनी आज ग्रामस्थांसमवेत केली.
याप्रसंगी माजी सनदी अधिकारी तानाजीराव साळुंखे, शिवाजी निवृत्ती साळुंखे, विष्णू पवार, विकास सेवा सोसायटीचे संचालक मधुकर जाधव, जयंत सुभाष साळुंखे, यशवंत जाधव, जाधव गुरुजी, महेंद्र मांडवे, संपत चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.