क्राइम
कराड परिसरात वेगवेगळ्या घटनांत दोघांची आत्महत्या
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड शहरानजिकच्या दोन वेगवेगळ्या घटनांत दोन पुरूषांनी आत्महत्या केल्याच्या घटना शहर पोलिसांत नोंद झाल्या आहेत. एका घटनेत परप्रांतीयाने तर दुसऱ्या घटनेत स्थानिकाने गळफास घेतला आहे. आगाशिवनगर व विजयनगर येथे या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत.
आगाशिवनगर येथे घडलेल्या घटनेत मंजुनाथ संगप्पा पाटील वय- ३५, मुळ रा. बागलकोट, कर्नाटक, सध्या रा. शिवकाशी अपार्टमेंट, कराड यांने इंद्रप्रस्थ कॉलनी परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसऱ्या घटनेत विजयनगर येथील राहत्या घरात नारायण ईश्वर वाघमारे वय ६५, रा. यांनी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन्ही आत्महत्यांचे कारण रात्री उशिरापर्यंत समजू शकले नव्हते. दोन्ही घटनांचा शहर पोलिसांकडून तपास सुरू आहे.