Uncategorized
कराडात पर्यावरण पूरक दिवाळीसाठी पालिकेकडून जनजागृती
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाकडून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ व ‘माझी वसुंधरा अभियान ४.०’ अभियानांतर्गत फटाके मुक्त व पर्यावरणपूरक दिवाळीबाबत शहरात जनजागृती करण्यात आली.
यामध्ये कराड नगरपरिषदेच्यावतीने शहरातील व्यापाऱ्यांना पर्यावरण पुरक दिवे बनवणे व विक्री संदर्भात जनजागृती करण्यात आली. तसेच या जनजागृतीद्वारे शहरातील सर्व व्यापारी वर्गाला पर्यावरणपुरक दिवे तयार करून विक्री करावी, जेणेकरून पर्यावरणाची हानी होणार नाही, असे आवाहन करण्यात आले. पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी , असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले.
दरम्यान, प्रदूषण मुक्त दीपावली साजरी करण्याचा तसेच हरित सण साजरे करण्याचा संकल्प देखील यावेळी करण्यात आला.