कराडच्या मराठी साहित्य मंडळातर्फे समाज भूषण पुरस्कार प्रदान

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण साहित्य नगरीत मराठी साहित्य मंडळातर्फे राज्यस्तरीय काव्य संमेलन व समाजभूषण पुरस्कार वितरण समारंभ नुकताच येथील कराड पं. स. च्या बचत भवनात पार पडला, अशी माहिती संमेलनाचे कराड तालुकाध्यक्ष राजाराम देसाई यांनी दिली.
संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ कवियीत्री रेखा दीक्षित (कोल्हापूर) यांच्या हस्ते झाले तर संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर (ठाणे), स्वागताध्यक्ष विनायकराव जाधव उर्फ कवी चंद्रकांत (कराड), कवी संमेलनाध्यक्ष प्राचार्य सुनील दबडे (आटपाडी) होते. समाजभूषण पुरस्कार विलासराव खरात (आटपाडी), साहित्यभूषण पुरस्कार जयश्री देशकुलकर्णी (कोथरूड), प्रसाद नातू (पुणे), स्वाती देशपांडे (नागपूर), गणपत पाटील (कोल्हापूर), अॅड. मुकुंदराव जाधव (जळगाव), गुंजार पाटील (उरण), छाया पाटील (विरार), युवराज खलाटे (बारामती), अॅड. अंजली महाजनी (धुळे), चंद्रशेखर धर्माधिकारी (पुणे), वसंत गायकवाड (वाठार तर्फ वडगाव), प्रा. उद्धव महाजन (पुणे), प्रा. शरदचंद्र काकडे-देशमुख (पुणे), प्रा. डॉ. प्रशांत गायकवाड (पेठ वडगाव), प्रदीप वाघ (पुणे), ज्योती देशपांडे (कोथरूड), किरण भावसार (नाशिक), वृषाली आठल्ये (पुणे) सायली जोगळेकर (रोहा), राजश्री सोले (हडपसर), मनीष वाघ (ठाणे), डॉ. विनायकराव जाधव उर्फ कवि चंद्रकांत हजारमाची ता. कराड यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी निमंत्रित, मान्यवर व नवोदित कवींनी वेगवेगळ्या विषयावरील आपल्या कविता सादर केल्या.