चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
वरुड ता खटाव येथील शेतात छापा कारवाई करून आनंद पोलीस सनी तब्बल २ लाख ४ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांचेकडून , तसेच दहिवडी विभागाच्या पोलीस उपाधीक्षक अश्विनी शेंडगे यांचेकडून औंध पोलिसांना अवैध अंमली पदार्थ आणि त्याची विक्री यांच्यावर कारवाई करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. या दरम्यान औंध पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर यांना खटाव तालुक्यातील वरुड येथील साळुंखेवस्ती मध्ये अमली पदार्थ गांजाचे उत्पादन घेतले असल्याचे माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी वरुड येथील साळुंखे वस्तीवर छापा कारवाई केली. यावेळी संशयीत ईश्वर दत्तात्रय जगदाळे हा त्याचे गुरांचे गोठ्यालगत ओढयाचे कडेला गांजाची झाडे लावुन आणि त्याची विक्री करीत असलेबाबत आढळून आले. पोलीस उपनिरीक्षक केंद्रे, सहाय्यक फौजदार पाटोळे, हवालदार देवकुळे, बनसोडे, भुजबळ, झारी, जाधव, कदम, फडतरे, महिला पोलीस जवान भुजबळ यांचे पथकाने ही कारवाई केल. या कारवाईत पोलिसांनी संशयित ईश्वर दत्तात्रय जगदाळे याच्याकडील दोन लाख चार हजार पाचशे रुपये किमतीचा गांजा जप्त केला. संशयता विरुद्ध औंध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी अशी लढवली शक्कल
सदरची कारवाई वेळी पोलीसांनी वेषांतर करुन गुरांची माहिती विचारत सदर संशयित आरोपीच्या गुरांचे गोठ्याजवळ बारकाईने पाहणी करुन सदरच्या गांजाची झाडे शोधुन यशस्वी कारवाई केली. औंध पोलीस स्टेशनची आतापर्यतची ही सर्वात मोठ्या रकमेची गांजाची कारवाई झाली आहे. त्यामुळे औंध परिसरातील नागरीकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे. सदर कारवाईमुळे औंध परिसरातील अवैध धंदे करणाऱ्या लोकांवर चाप बसणार असून गांजामुळे तरुण पिढी व्यसनाधिनतेपासुन परावृत्त होणार आहे.
या पथकाने केली यशस्वी कारवाई
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपाधीक्षक अश्विनी शेंडगे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, सहा. फौज.पी.एस. पाटोळे, हवालदार डी. वाय. देवकुळे, हवालदार आर. एस. बनसोडे, पी. डी. भुजबळ, एम आर जाधव, एस. एम. झारी, एम. व्ही. कदम, महिला पोलीस जवान एम. के. फडतरे, एन. पी. भुजबळ यांनी केली.