कराडात भीषण स्फोटात सातजण गंभीर – changbhalanews
क्राइम

कराडात भीषण स्फोटात सातजण गंभीर

घरांच्या भिंतींची पडझड, वाहनांचे नुकसान

हैबत आडके  | कराड प्रतिनिधी 
कराड शहरातील मुजावर कॉलनी येथील पाण्याच्या टाकीजवळ एका इमारतीत आज (बुधवारी) पहाटेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. त्यामध्ये इमारतीचे मोठे नुकसान झाले असून 7 जण गंभीर जखमी तर अन्य तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. घटनास्थळी बघ्यांची यांची मोठी गर्दी जमली आहे. हा स्फोट गॅस सिलेंडरच्या टाकीला गळती लागल्याने झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे , त्याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे.

शरीफ मुबारक मुल्ला वय 36, सुलताना शरीफ मुल्ला वय 32, जोया शरीफ मुल्ला वय 10, राहत शरीफ मुल्ला वय 7, यांच्यासह अशोक दिनकर पवार वय 54,, सुनीता अशोक पवार वय 45, दत्तात्रय बंडू खिलारे वय 80 सर्व राहणार मुजावर कॉलनी, शांतिनगर, कराड अशी जखमींची नावे आहेत.

मिळालेली माहिती अशी, आज बुधवारी पहाटे मुजावर कॉलनी परिसरात नागरिक झोपेत असताना पाण्याच्या टाकी जवळील शरीफ मुल्ला यांच्या इमारतीत भीषण स्फोट झाला. गॅस सिलेंडरच्या टाकीला गळती लागल्याने हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरून गेला. ज्या इमारतीत स्फोट झाला, त्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. भिंती पडल्या आहेत. तीन ते चार वाहनांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये दुचाकी गाड्यांचा समावेश आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत.

 

या घटनेत मुल्ला कुटुंबातील शरीफ मुल्ला, सुलताना मुल्ला, जोया मुल्ला, राहत मुल्ला असे चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शेजारच्या घरातील अशोक पवार, सुनीता पवार, दत्तात्रय खिलारे असे आणखी तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर आणखी तीनजण किरकोळ जखमी झाले आहेत.

स्फोटानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. या घटनेची कराड शहरात मोठी चर्चा सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांकडून आसपासच्या परिसरात बॅरिकेट उभा करून गर्दी हटवण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे.

गॅस सिलेंडरच्या टाक्या सुरक्षित

जेथे स्फोट झाला, त्या घरातील शेगडी व काही गॅस टाक्या सुरक्षित आहेत, त्या तात्काळ नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी हलवल्या आहेत. त्यामुळे स्फोट नेमका कशामुळे झाला? गॅस गळतीमुळे झाला की आणखी कशामुळे? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पोलिसांच्या चौकशीतून आणि तपासातून ही बाब समोर येईल.

 

 

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close