कराड | प्रतिनिधी
बेलवडे बुद्रुक ता. कराड श्नीमती समाताई रघुनाथ साळुंखे, वय ८२ यांचे दिनांक 23 ऑक्टोबर 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्या सामाजिक कार्यकर्ते आनंदा रघुनाथ साळुंखे व कराड येथील औद्योगिक शासकीय महाविद्यालय (आयटीआय काॅलेजचे) प्रा. भीमराव रघुनाथ साळुंखे यांच्या आई होत. त्या परिसरात ‘नानी’ नावाने परिचित होत्या. स्वभावाने प्रेमळ असणाऱ्या नानी यांनी पती रघुनाथ साळुंखे यांना भक्कम साथ देत कष्टातून संसार उभा केला होता. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रक्षाविसर्जन गुरूवार, दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता बेलवडे बुद्रुक येथील वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक विवाहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.