महाबळेश्वरला दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत स्फोट – changbhalanews
Uncategorizedक्राइम

महाबळेश्वरला दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत स्फोट

दहा मुले भाजून जखमी, तिघांना पुण्याला हलविले

चांगभलं ऑनलाइन | सातारा

महाबळेश्वर शहरातील कोळी आळीत दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीत जनरेटरच्या इंधन पाईपला गळती झाल्यामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटात दहा लहान मुले भाजल्याने ती गंभीर जखमी झाली आहेत. जखमींना महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तीन मुलांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुणे येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वर येथील कोळी आळी मधील दुर्गामाता मंडळाची विसर्जन मिरवणूक मंगळवारी काढण्यात आली होती. ही विसर्जन मिरवणूक मुख्य मार्गावरून जात असताना जनरेटरच्या पेट्रोल पाइपला गळती लागली. त्यामुळे जनरेटरने पेट घेतला आणि मोठा स्फोट झाला. या आगीत दुर्गादेवीच्या मूर्तीजवळ बसलेली चार ते सात वयोगटातील दहा मुले भाजून जखमी झाली. मुलांच्या अंगावरील कपड्याने पेट घेतल्याने मुले भाजली. सर्व जखमींना महाबळेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सातारा येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तीन मुलांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुण्याला पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच आमदार मकरंद पाटील यांनी वाईतील दसऱ्याचे कार्यक्रम अर्धवट सोडून सातारा गाठला. रुग्णालयात जावून त्यांनी जखमींच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती घेतली. नातेवाईकांशी चर्चा केली. प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनीही तातडीने सातारा येथील रुग्णालयाशी संपर्क साधला. तहसीलदार तेजस्विनी पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून माहिती घेतली. त्याचप्रमाणे सातारा येथील डॉक्टरांशी त्यांनी संपर्क साधला. माजी नगरसेवक संतोष शिंदे हे जखमी मुलांसोबत आहेत. तीन मुलांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. जातींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close