कराडला ‘या’ काॅलेजमध्ये झाली ‘वैज्ञानिक’ रांगोळी स्पर्धा
काय होती संकल्पना : कोणी मिळवलं बक्षीस : घ्या जाणून
कराड | प्रतिनिधी
इंटर्नल क्वालिटी अशुरन्स सेल आणि डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी इंडियाच्यावतीने स्टुडंटस् युनिटचे अनावरण व वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा नुकतीच पार पडली. स्पर्धेसाठी 80 स्पर्धकांनी उत्सफुर्तपणे सहभाग घेतला.
पदवी विभागामधून कु. प्रांजली शिंदे, कु. प्रिती मोहिते व कु. उज्ज्वला शेळके यांच्या गटाने प्रथम क्रमांक, द्वितीय कमांक कु. श्रुती जाधव, कु. संध्या शेलार यांनी मिळवला. पदव्युत्तर विभागामधून कु. मधुरा पाटील व कु. प्रियांका कोळी यांना प्रथम क्रमांक, कु. मयुरी डुक्कुरवाडकर, कु. वैष्णवी पाटील व आदेश भदे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तसेच तृतीय क्रमांक शशुभम जाधव, कु. रूचिता गुरव व कु. शरयु खेडेकर यांनी मिळवला. डॉ. एस. बी. केंगार यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा उपक्रम पार पडला. तसेच डॉ. एस. एच. बुरूंगले यांनी जिमखाना उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले. डॉ. जी. जी. पोतदार आय. क्यु. ए. .सी. समन्वयक होते.
डॉ. ए. एम. देशमुख हे एम. बी. एस. आय. इंडियाचे अध्यक्ष असून डॉ. ए. ए. राऊत हे कॉलेज मधील एम. बी. एस. आय. समन्वयक आहेत. विभाग प्रमुख डॉ. जे. यु. पाटील हे कार्यक्रमाचे संयोजक होते. श्रीमती के. ए. यादव डॉ. एस. व्ही. ओतारी, डॉ. एस. एच. कोळी, एस. बी. जाधव, आर. व्ही. दराडे जी. एम. शिंदे, पी. एस. बांबरे, के. ए. सुतार, एस. ए. लोहार, कु. एस. एस. शिंदे व सौ. पी. जे. पाटील यांनी कार्यक्रमाचे व्यवस्थापन केले.
संस्थेचे सचिव अल्ताफ हुसेन मुल्ला तसेच विश्वस्त व सदस्य अरुण पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. केंगार यांनी विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीचे कौतुक केले.
दरम्यान, या स्पर्धेत पेंडॉमिक कोविड-19, यासह अन्य विविध विषयांची रांगोळीतून वैज्ञानिक मांडणी करण्यात आली. या अभिनव उपक्रमाची विद्यानगरात चर्चा सुरू आहे.