भाजप मंत्र्यावर झालेल्या शाई फेकीवरून राष्ट्रवादीच्या आमदाराने दिली ‘ही’ प्रतिक्रिया म्हणाले…. – changbhalanews
राजकियराज्य

भाजप मंत्र्यावर झालेल्या शाई फेकीवरून राष्ट्रवादीच्या आमदाराने दिली ‘ही’ प्रतिक्रिया म्हणाले….

चांगभलं ऑनलाइन | सोलापूर

पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहकाल काल भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकून खासगीकरणचा विरोध करत काळे झेंडे दाखवले होते. दरम्यान, या घटनेबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीयं. त्यामध्ये त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.

सोलापूरचे माजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर धनगर समाज कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी काही दिवसांपूर्वी भंडारा उधळला होता. या प्रकरणानंतर सोलापूर शहर पोलीस दल सतर्क झाले होते. रविवार आणि सोमवार असे दोन दिवस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील सोलापूर दौऱ्यावर आले आहेत.चंद्रकांत पाटील दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव काही मोजक्याच कार्यकर्त्यांना शासकीय विश्रामगृहात प्रवेश दिला होता. मात्र, भीम आर्मीच्या कार्यकर्त्यानं चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकून काळे झेंडे दाखवत खासगीकरणाविरोधात घोषणा दिल्या.

      सनदशीर मार्ग असताना शाईफेक कशाला…
दरम्यान, या घटनेबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया लागले आहेत. राजकीय विरोधक असले तरी राष्ट्रवादीचचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. याबाबत आमदार रोहित पवार यांनी असं म्हटलंय की, ” हे सरकार आल्यापासून त्यांची धोरणं ही युवांविरोधी असल्याने युवांमध्ये संतापाची लाट आहे. पण या संतापाला वाट करुन देऊन सरकारला वाटेवर आणण्याचे अनेक सनदशीर मार्गही उपलब्ध आहेत. त्यामुळं मंत्र्यांवर शाईफेक करणं चुकीचं असून चंद्रकांतदादा पाटील यांच्यावरील शाईफेकीचा मी विरोध करतो. यासोबतच सरकारनेही गेंड्याची कातडी पांघरून न बसता लोकांमधील संताप लक्षात घेऊन आपली जनहितविरोधी धोरणं बदलावीत. अन्यथा यापुढंही पदोपदी त्यांना लोकांच्या संतापाला आणि विरोधाला अधिक तीव्रतेने सामोरं जावं लागेल.”

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close