धनगर समाजाकडून झाला ‘या’ कुलगुरूंचा पहिला सत्कार
चांगभलं ऑनलाइन | दहिवडी प्रतिनिधी
धनगर समाजाने शैक्षणिक क्षेत्रात क्रांती करावी, समाजातील विद्यार्थ्यांनी उंच भरारी घ्यावी , असे प्रतिपादन सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी माणदेशाचे सुपुत्र आणि शिक्षण क्षेत्रातील दिग्गज व्यक्तीमत्व डॉ. प्रकाश अण्णा महानवर यांची निवड झाली. त्याबद्दल दहिवडी ता. माण येथे सातारा जिल्हा ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष एम.डी.दडस, तालुकाध्यक्ष वसंतराव सजगणे यांच्या उपस्थितीत महानवर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. विविध संस्था व संघटना यांच्यावतीनेही डॉ. प्रकाश महानवर यांना सन्मानित करण्यात आले तसेच आरटीओ ऑफिसर सौरभ दडस यांचाही सन्मान करण्यात आला.
महानवर म्हणाले की, जास्तीतजास्त युवक-युवती अधिकारी बनले पाहिजेत. परिस्थिती कशीही असो जिद्द, चिकाटी ठेवली आणि मेहनत घेतली तर यश हमखास मिळते. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून समाजाची सेवा केली पाहिजे. यावेळी डॉ. महानवर, प्रवीण काकडे, सौरभ दडस, वडूजच्या उपविभागीय अधिकारी अश्विनी शेंडगे, अर्जुनराव काळे यांची भाषणे झाली. प्रास्ताविक एम. डी.दडस यांनी केले. आभार दोरगे यांनी मानले.