देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर – changbhalanews
Uncategorizedराज्य

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती

मुंबई | प्रतिनिधी
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. याशिवाय अन्य चार राज्यांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पाचही राज्यांचे निकाल 3 डिसेंबरला येतील.
देशातील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी एक पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना दिली आहे. राजस्थानमध्ये 200 जागांसाठी 23 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. बहुमतासाठी 101 जागांची आवश्यकता आहे. मध्य प्रदेश मध्ये 230 जागांसाठी 17 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. बहुमतासाठी 116 जागा लागतील. छत्तीसगड मध्ये 90 जागांसाठी सात आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होईल तर बहुमतासाठी 46 जागा लागतील. तेलंगणामध्ये 119 जागांसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होईल. बहुमतासाठी 60 जागा लागतील. मिझोराममध्ये 40 जागांसाठी 7 नोव्हेंबरला मतदान होईल तर सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षाला बहुमतासाठी 21 जागा आवश्यक असतील. पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल 3 डिसेंबरला जाहीर केला जाईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close