कृषी कन्यांकडून गांडूळ खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन : कापील येथे उपक्रम
कराड | प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न शासकीय कृषी महाविद्यालय कराड येथील कृषी कन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्यागिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कापील ता. कराड गावात गांडूळ खत तयार करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कृषी कन्यांनी शगावातील अजित पवार या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन गांडूळ खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना करून दाखवले. गांडूळ खतामुळे मुख्य अन्नद्रव्य पिकासाठी उपलब्ध होतात , जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते, जमिनीत पाणी आणि हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते हे फायदे व खत तयार करताना घ्यावयाची काळजी, याबद्दल कृषी कन्यांनी माहिती दिली.
सदर प्रात्यक्षिकासाठी कराडच्या शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेंद्र हासुरे, केंद्रप्रमुख डॉ. उल्हास बोरले, कार्यक्रमाधिकारी डॉ. अर्चना ताठे आणि विषयतज्ञ डॉ. संपत कोळपे यांनी कृषी कन्यांना मार्गदर्शन केले. हे प्रात्यक्षिक कृषीकन्या वैष्णवी गायकवाड, वैष्णवी ओहोळ, राजनंदिनी फरांदे, अमृता पिसाळ, दीक्षा रेंगडे, पूजा सावंत यांनी केले.