धनगर समाज युवा मल्हार सेना विदर्भ युवक कार्याध्यक्ष पदी रविराज कष्टे
धनगर समाज युवा मल्हार सेना विदर्भ युवक कार्याध्यक्ष पदी रवि राज कष्टे
वाशिम प्रतिनिधी नितिन सातपुते :- धनगर समाज युवा मल्हार सेना महाराष्ट्र राज्य विदर्भ युवक कार्याध्यक्ष पदी वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील करडा येथील रवि राज कष्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य धनगर समाज युवा मल्हार सेना संस्थापक अध्यक्ष मनोज सिराम यांनी बीड येथे वरीष्ठ पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या ऑनलाईन बैठकीत धनगर समाज युवा मल्हार सेना विदर्भ युवक कार्याध्यक्ष या जबाबदारीच्या पदावर नियुक्त केले आहे. समाजाची बांधिलकी जोपासत प्रामाणिकपणे समाज हिताचे कार्य करीत संघटनेची प्रतिमा उंचावण्यासाठी व महाराष्ट्रात समाज संघटन वाढविण्यासाठी आपण अखंडपणे कार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रवि राज कष्टे यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांच्या या निवडी बद्दल समाज बांधवांकडून त्यांचेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
यावेळी संघटनेचे सरसेनापती प्रकाश भैया सोनसले,प्रदेशाध्यक्ष विनोद अण्णा खेमणार,राज्यमुख्य सचिव ज्ञानेश्वर भाऊ मुखमाले,विदर्भ युवक अध्यक्ष विष्णू भाऊ साखरे, यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली