कराड परिसरातील गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले 92 जण हद्दपार
गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडणेसाठी कराड शहर पोलिसांचे पाऊल...

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रात सर्वजनिक गणेशोत्सव मोठया प्रमाणात उत्साहाने साजरा होत आहे. कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील सार्वजनिक सण, उत्सवा दरम्यान गोंधळ करुन कायदा व सुव्यवस्था निर्माण करणा-या तसेच पोलीस अभिलेखावरील गुन्हे असलेले संशयित आरोपी यांचे गणेशात्सवा दरम्यान कराड पोलीस ठाणे हद्दीत येणेस मज्जाव करणेकरीता उपविभागीय दंडाधिकारी कराड विभाग कराड यांचेकडे प्रस्ताव सादर करणेत आले होते. या प्रस्तावास मंजुरी मिळाली असून तब्बल 92 जणांना पोलिसांवर हद्दपार करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत व कायदा व सुव्यवस्थेत पार पाडणेसाठी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांनी रेकॉर्डवरील लोकांचे अभिलेख पडताळुन त्यांचेवर गणेशोत्सवात योग्य व कडक प्रतिबंधक कारवाई होणेसाठी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविले होते. गुन्हेगारी क्षेत्रातील माहीर आरोपीतांवर बीएनएनएस कलम 163 (२) प्रमाणे पाठविले प्रस्तावांची चौकशी होवुन उपविभागीय दंडाधिकारी कराड विभाग कराड यांनी गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेल्या आरोपींना गणेशेत्सवाचे अंतिम चरणामध्ये कराड शहर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये प्रवेश व वास्तव्यबंदी केलेली आहे. याबाबतचे आदेश काल दि. 13. सप्टेंबर 2024 रोजी प्राप्त झाल्यानंतर त्या आदेशांची कराड शहर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांचे पथकाने बजावणी संबंधीतांना करुन 92 जणांना कराड शहर पोलीस ठाण्याची हद्द सोडणेचे फर्मान काढले आहे. तसेच बीएनएनएस कलम 168 प्रमाणे 307, बीएनएनएस कलम 126 प्रमाणे 50, बीएनएनएस कलम 128 प्रमाणे 28, बीएनएनएस कलम 129 प्रमाणे 05, प्रोव्ही 93 प्रमाणे 10 प्रमाणे महाराष्ट्रात पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे 02 जणावर सार्वजनिक गणेशोत्सव अनुषंगाने प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
कराड शहरातील सुज्ञ नागरिकांना व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील पदाधिकारी यांना कराड शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी कराड शहर पोलीसांतर्फे आवाहन करण्यात आले आहे की, कराड शहरामध्ये 19 पोलीस अधिकारी, 169 पोलीस अंमलदार व 50 होमगार्ड असा बंदोबस्तं नेमण्यात आला असुन कराड शहरामध्ये 240 कॅमेरे मिरवणुक मार्गावर, मेन मार्गावर 45 कॅमेरे ठेवण्यात आले आहेत. कोणी व्यक्ती गणेशोत्सवा दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडविणेचा प्रयत्न करीत असल्याचे आढळुन आल्यास तात्काळ पोलीस ठाण्याचे फोन नंबर 02164-222233, अथवा नजिकच्या पोलीस अंमलदार , अधिकारी यांना कळवावे किंवा डायल ११२ वर कॉल करुन कळवावे , असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
तात्पुरते हद्दपार करणेत आले इसमांनी हदृपार कालावधीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी कराड विभाग कराड अथवा कराड शहर पोलीस ठाणेचे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांचे परवानगीशिवाय प्रवेश करु नये. हद्दपार इसमाने विनापरवाना कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत प्रवेश केल्यास किंवा हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्यास अशा हदृपार व्यक्तींवर कराड शहर पोलीस ठाण्याकडुन प्रचलीत कायदयान्वये कडक कायदेशीर कारवाई करणेत येणार आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख , अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय दंडाधिकारी अतुल म्हेत्रे , पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश कड, पोलीस उपनिरीक्षक निखील मगदुम, पो.हवा. शशिकांत काळे, अमित पवार, अशोक वाडकर, सपना साळुखे, पोलीस नाईक अनिल स्वामी, संदीप कुभार, पो.शि., आनंदा जाधव, धीरज कोरडे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, मोहसिन मोमिन, हर्ष सुखदेव, मोहसिन मोमिन, संग्राम पाटील, महिला पोलीस सोनाली पिसाळ यांनी केलेली आहे.
कराड शहर डीबी पथकाने केले तडीपार इसमास जेरबंद…
दरम्यान, मुजावर कॉलनीजवळ, रेठरेकर चौक, कराड येथे 2 वर्षाकरीता तडीपार असलेला संशयित निशिकांत निवास शिंदे हा त्या ठिकाणी आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांना खबऱ्याकडून मिळाली होती. त्याबाबत त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक गणेश कड व पथकास माहिती देवुन तात्काळ कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार सदर पथकाने मुजावर कॉलनी, रेठरेकर चौकात सापळा रचुन मिळालेले माहितीनुसार तडीपार संशयित निशिकांत निवास शिंदे वय 23 वर्षे यास जागीच पकडले . त्याबाबत कराड शहर पोलीस ठाणेस गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो. हवा. शशिकांत काळे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर , कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक के.एन.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक गणेश कड, पोलीस हवा. शशिकांत काळे, अमित पवार, पोलीस नाईक अनिल स्वामी. पो. कॉ. अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, संग्राम पाटील. धिरज कोरडे, मोहसीन मोमीन यांच्या पथकाने केली.