अथणी-रयतचे प्रति मे.टन ३१५० रूपये प्रमाणे ऊस बील बँकेत जमा
मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांची माहिती

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
शेवाळेवाडी (म्हासोली), ता.कराड येथील अथणी शुगर्स (रयत युनिट) या साखर कारखान्याने गळीत हंगाम सन २०२३-२४ मध्ये दि. ३० नोव्हेंबर २०२३ अखेर ३३९२९ मे.टन ऊस गाळप केले आहे. सदर गळीत केलेल्या ऊसाचे प्रति मे.टन ३१५० रूपये प्रमाणे ऊस बिल संबंधित शेतक-यांच्या बँक खात्यावर जमा केले असल्याची माहीती अथणी शुगर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास पाटील यांनी दिली. यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील, कंपनीचे एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर व सी.एफ.ओ योगेश पाटील, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर सुशांत पाटील व युनिट हेड रविन्द्र देशमुख उपस्थित होते.
अथणी शुगर्स लि. यांनी अलिकडेच कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम पुर्ण केले असून वाढीव क्षमतेने कारखान्याचे गाळप सुरू आहे. तसेच सहवीज निर्मिती प्रकल्प देखील लवकरच कार्यान्वित होत आहे. अथणी शुगर्सच्या रयत युनिटने चालू गळीत हंगामात दि. ८ डिसेंबर.२०२३ अखेर ५९६२० मे.टन ऊस गाळप केले असून सरासरी ९.९० टक्क्यांनी साखर उतारा राखत ५६९९० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. शेतक-यांनी कारखान्यावर दाखविलेला विश्वास व शेतक-यांचे हित विचारात घेवून चालू गळीत हंगामातील गाळपास आलेल्या संपुर्ण ऊसाचे पेमेंट दर पंधरवडयास एकरक्कमी ३१५० रूपये प्र.मे.टन प्रमाणे अदा करणार असल्याची माहीती श्रीनिवास पाटील यांनी दिली.