सातारा लोकसभा मतदारसंघात छाननीमध्ये 21 वैध तर 3 नामनिर्देशनपत्र अवैध
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
सातारा लोकसभेसाठी एकूण 24 उमेदवारांनी 33 नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. आज झालेल्या छाननीमध्ये 21 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध तर 3 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे.
आनंद रमेश थोरवडे, बहुजन समाज पार्टी, श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहमहाराज भोसले भारतीय जनता पार्टी, शशिकांत जयवंतराव शिंदे, नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्ष, प्रशांत रघुनाथ कदम वंचित बहुजन आघाडी, तुषार विजय मोतलिंग बहुजन मुक्ति पार्टी, दादासाहेब वसंतराव ओव्हाळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), दिलीप हरिभाऊ बर्गे भारतीय जवान किसान पार्टी, सयाजी गणपत वाघमारे बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, डॉ. अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले अपक्ष, सुरेशराव दिनकर कोरडे अपक्ष, संजय कोंडीबा गाडे अपक्ष, चंद्रकांत जाणू कांबळे अपक्ष, निवृत्ती केरु शिंदे अपक्ष, प्रतिभा शेलार अपक्ष, सदाशिव साहेबराव बागल अपक्ष, मारुती धोंडीराम जानकर अपक्ष, विठ्ठल सखाराम कदम अपक्ष, विश्वजीत पाटील-उंडाळकर अपक्ष, सचिन सुभाष महाजन अपक्ष, सागर शरद भिसे अपक्ष, सीमा सुनिल पोतदार अपक्ष या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत.