दोन चोरट्याकडून 17 किलो चंदन जप्त
चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
तापोळा-महाबळेश्वर रस्त्यावर – मौजे वानवली गावाचे हद्दीवर रस्त्यालगत उभी असलेल्या चारचाकी गाडी गाडी क्रमांक – MH-01-VA-4252 गाडीची वन विभागाने तपासणी केली असता गाडीमध्ये दोन इसम व गाडीमध्ये एका पिशवीमध्ये चंदन लाकडाचे तुकडे (वजन 17.231 किग्रॅ.), बॅटरी 01, निगार्ड 01, – कटर – 01, करवत 03, कुदळ 01, मोबाईल संच 03 इत्यादी साहित्य मिळाल्याने – सदरचे इसम हे चंदन तस्कर असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सदरचे साहित्य जप्त करून वनविभागाने दोन्ही संशयितांना अटक केली.
1. अक्षय अर्जुन चव्हाण वय 20 वर्षे रा. फत्तेपूर ता. सातारा जि. सातारा – 2. आशिष विकास पवार वय 16 वर्षे रा. खतगुण ता. खटाव जि. सातारा अशा अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
संशयित आरोपींविरुद्ध भारतीय वनअधिनियम, 1927 चे कलम 41 (2) (ब) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई सातारा वन विभागाच्या उपवनसंरक्षक श्रीमती. अदिती भारद्वाज, महेश झांजुर्णे सहाय्यक वनसंरक्षक, यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश महांगडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, महाबळेश्वर, यशवंत नलावडे पोलीस निरीक्षक, महाबळेश्वर,. रऊफ ईनामदार, पोलीस उपनिरीक्षक महाबळेश्वर, श्रीमती. अर्चना शिंदे वनपाल, तापोळा, श्री. संदीप पाटोळे वनरक्षक, कळमगाव यांनी सदरची कारवाई केली. पुढील तपास वनपाल तापोळा श्रीमती अर्चना शिंदे करीत आहेत.