सातारा लोकसभेसाठी शेवटच्या दिवशी 16 उमेदवारी अर्ज दाखल – changbhalanews
राजकिय

सातारा लोकसभेसाठी शेवटच्या दिवशी 16 उमेदवारी अर्ज दाखल

चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
सातारा लोकसभेच्या निवडणुकीसाठी आज शुक्रवार दि. 19 एप्रिल 2024 रोजी 16 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत. तर एकूण 33 नामनिर्देशनपत्र दाखल झाली आहेत.

वैशाली शशिकांत शिंदे, रा. ल्हासुर्णे ता. कोरेगाव जि. सातारा नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरचंद्र पवार) पक्ष, सिमा सुनिल पोतदार, रा. पुसेसावळी ता. खटाव जि. सातारा अपक्ष, प्रतिभा सुनिल शेलार, रा. 79, चकोर बेकरी समोर, सोमवार पेठ, सातारा अपक्ष, विठ्ठल सखाराम कदम, रा. जोर पो. वयगाव ता. वाई जि. सातारा अपक्ष, शशिकांत जयवंतराव शिंदे, रा. ल्हासुर्णे ता. कोरेगाव जि. सातारा नॅशनॅलिस्ट कॉग्रेस पार्टी (शरचंद्र पवार) पक्ष, प्रशांत रघुनाथ कदम, रा. वडगाव (उंब्रज) ता. कराड जि. सातारा वंचित बहुजन आघाडी पक्ष,

विश्वजित अशोक पाटील, रा. उंडाळे ता. कराड जि. सातारा अपक्ष, श्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंहमहाराज भोसले, जलमंदिर पॅलेस सातारा भारतीय जनता पार्टी पक्ष, मारुती धोंडीराम जानकर, रा. 14 केसकर कॉलनी, शिवनगर दरे खुर्द सातारा शहर अपक्ष, आनंदा रमेश थोरवडे, रा. 62/2 प्रभात टॉकीज परिसर बुधवार पेठ, कराड बहुजन समाज पार्टी पक्षाकडून 2 नामनिर्देशनपत्र,

अभिजीत वामनराव आवाडे-बिचुकले रा, 338 गुरुवार पेठ, सातारा अपक्ष, सचिन सुभाष महाजन, रा. बुध ता. खटाव जि. सातारा अपक्ष, सदाशिव साहेबराव बागल, रा. गोवे ता.जि. सातारा अपक्ष, गणेश शिवाजी घाडगे, रा. शिबेवाडी (कुंभारगाव) ता. पाटण जि. सातारा अपक्ष, तुषार विजय मोतलिंग रा, कळंबे ता. वाई जि. सातारा बहुजन मुक्ती पार्टी पक्षाकडून नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close