कराडला रविवारी १४१ महिलांचा पुरस्काराने होणार सन्मान – changbhalanews
Uncategorized

कराडला रविवारी १४१ महिलांचा पुरस्काराने होणार सन्मान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक ट्रस्ट आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने आयोजन

कराड प्रतिनिधी | चांगभलं वृत्तसेवा
अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्यावतीने राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध क्षेत्रातील महिलांना आदर्श माता पुरस्कार व अहिल्यारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा समारंभ दिनांक रविवार दि. १५ जून रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे दुपारी १२ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

या कार्यक्रमास माजी आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्णवर – पाटील, श्रीमंत योगीराज संजयसिंह गायकवाड (कोल्हापूर), प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बलवंत पाटील, उद्योगपती बाळासाहेब खरात, ग्रामीण कथाकार रवींद्र कोकरे (बारामती), नगरसेवक अशोकराव शेडगे, कृगर कंपनी ठाणेचे जनरल मॅनेजर संपतराव शेंडगे, आरटीओ इन्स्पेक्टर सौरभ दडस (सांगली), कराडचे माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे आजीव सदस्य उत्तमराव गलांडे, उद्योगपती हनुमंतराव दुधाळ , सुनील शेंडगे, मुंबई म्हाडाचे अधिकारी शंकरराव विरकर, मलकापूरचे माजी नगरसेवक आबासाहेब गावडे, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती संभाजीराव काकडे, कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक व ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण काकडे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यक्रमात १४१ कर्तुत्ववान महिलांना आदर्श माता व अहिल्यारत्न पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा पुरस्कार सोहळा असून यानिमित्ताने स्त्री शक्तीचा जागर केला जाणार आहे. राज्यातील तब्बल ३०० महिलांना सन्मानित करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यामध्ये कराड येथे १४१ महिलांचा सन्मान होणार आहे. यानंतर पुणे व मुंबई या ठिकाणी महिलांचा सन्मान सोहळा होणार आहे. तरी रविवार, दि. १५ जून रोजी कराड येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात दुपारी बारा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास सर्व समाज बंधू आणि भगिनींनी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीचे प्रमुख सतीश थोरात व आनंदराव कचरे यांनी केले आहे.

चांगभलं समूह

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close