विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात 14 उमेदवारी अर्ज दाखल
चांगभलं ऑनलाइन | सातारा प्रतिनिधी
विधानसभा निवडणूक 2024 साठी 12 उमेदवारांची 14 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. यामध्ये 258- माण मध्ये 3 उमेदवारांची 3 पत्रे, 260- कराड दक्षीण 2 उमेदवारांची 2 नामनिर्देशनपत्रे आणि 262- सातारा दोन उमेदवारांची 2 नामनिर्देशनपत्रे , 257-कोरेगाव 2 उमेदवारांची 2 नामनिर्देशनपत्रे, 255-फलटण 1 उमेदवाराचे 3 नामनिर्देशन, 256-वाई 2 उमेदवारांचे 2 नामनिर्देशनपत्र, अशी एकूण 12 उमेदवारांची 14 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. दि. 22 ऑक्टोंबर पासून आजअखेर 39 उमेदवारांची 47 नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत.
258- माण विधानसभा मतदार संघातून 3 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यामध्ये बजरंग रामचंद्र पवार अपक्ष, प्रसाद मल्हारराव उंबासे अपक्ष, महेश मारुती कर्चे यांचा समावेश आहे.
260- कराड दक्षीण मतदारसंघामध्ये मतदारसंघामध्ये 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यामध्ये विद्याधर कृष्णा गायकवाड बहुजन समाज पार्टी, गणेश शिवाजी कापे अपक्ष
262- सातारा मतदारसंघामध्ये 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यामध्ये दादासो वसंतराव ओव्हाळ अपक्ष, हणमंत देविदास तुपे अपक्ष
257- कोरेगाव मतदार विधानसभा मतदार संघात 2 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. चंद्रकांत जाणू कांबळे वंचित बहुजन आघाडी, दादासो वसंतराव ओव्हाळ अपक्ष
255- फलटण मतदार विधानसभा मतदार संघात एका उमेदवारांनी तीन नामनिर्देशपपत्र दाखल केले आहे यामध्ये दिपक प्रल्हाद चवहाण, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरचंद्र पवार
256- वाई मतदार विधानसभा मतदार संघात 2 उमेदवारांनी 2 नामनिर्देशपपत्र दाखल केले आहे यामध्ये प्रदिप रामदास माने अपक्ष, विनय अबुलाल जाधव अपक्ष
261- पाटण, 260 कराड उत्तर विधानसभा मतदार संघाची आकडेवारी निरंक आहे.