सुशांतने प्रियांकाला लिहिली होती चिठ्ठी, रियाला आवडत नव्हतं भावा- बहिणीचं बॉण्डिंग – changbhalanews
Uncategorized

सुशांतने प्रियांकाला लिहिली होती चिठ्ठी, रियाला आवडत नव्हतं भावा- बहिणीचं बॉण्डिंग

सुशांतसिंह राजपूत त्याच्या बहिणींच्या आणि त्यातही मोठी बहीण प्रियांकाच्या किती जवळचा होता हे दाखवणारी एकपोस्ट व्हायरल झाली आहे.

अलीकडेच सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी रिया चक्रवर्तीवर आरोप करत म्हटलं होतं की, तिने सुशांतला जाणीवपूर्वक कुटुंबापासून दूर केलं. असं म्हटलं जातं की सुशांतची बहीण प्रियांका जेव्हा रियाला पहिल्यांदा भेटली होती त्याच्या आठवड्याभरानंतरच बहीण- भावांमध्ये कटूता आली होती. रियानेच दोघांमध्ये भांडण लावलं होतं.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये रिया आणि प्रियांकाची भेट झाली होती. तेव्हा सुशांतला भेटायला म्हणून खास प्रियांका मुंबईत आली होती. असे म्हणतात की रिया चक्रवर्ती यांच्या उपस्थितीत सुशांतने आपल्या बहिणीसाठी हृदय लिहिले होते. टाइम्सन्यूला सुशांतचे तेच पत्र आहे, ज्यात सुशांतने आपली बहीण प्रियंकासाठी लिहिले आहे. याचवेळी रियाच्या उपस्थितीत सुशांतने बहिणीसाठी खास पत्र लिहिलं होतं. टाइम्सनाऊच्या हाती आता हे पत्र लागलं आहे. हे पत्र पाहून प्रियांका आणि सुशांत एकमेकांच्या किती जवळ होते हे कळून येते.

या पत्राची सुरुवात सुशांतने सोनचिडिया नावाने केली. त त्याने लिहिले की, ‘माझ्या आत्म्याच्या कोपऱ्यापासून माझ्या ज्ञानाच्या खोलीपर्यंत आणि माझ्या आईचा प्रकाश सतत तेवत ठेवण्यात तुझ्याहून सक्षम कोणी नाही. माझ्या निर्णयांच्या अंधारात तू माझी मार्कर आहेस. तू माझी सर्वोत्तम बहीण आहेस. तू माझ्या ओळींमधला एक पॉझ आहेस. प्रेम आणि सन्मानच्यामध्ये गोंधळलेला तुझा भाऊ.’

सुशांतच्या कुटूंबाच्या मते, या पत्रात जसा उल्लेख केला आहे तसं सुशांत आणि त्याच्या बहिणीचं नातं रियाला सतत खटकत होतं. तिने दोघांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. पण यात तिला फारसं यश मिळालं नाही.

laksh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close