नागरिकता सुधारणा विधेयला शेगवात कडाडून विरोध
भारतीय संविधानाच्या मुळ गाभा असलेल्या एकात्मतेला डावलून बहुमतच्या आणि सत्तेच्या जोरावर भाजप सरकारने नागरिकत्व सुधारणा हे विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर करून घेतले आहे. राष्ट्रपतींनी हा कायदा लागू करण्यापूर्वी या कायद्याचे स्वयंमूल्यमापन करून निर्णय घ्यावा अशी विनंती करीत या कायद्याच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे राजकीय पक्षांसह विविध संघटनांच्या वतीने भव्य अशा मूक मोर्चाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. अतिशय शांत आणि शिस्त पद्धत रीतीने काढण्यात आलेल्या या मोर्चात राजकीय पक्षांसह मुस्लिम समाज एकवटला होता सोमवारी सकाळी 11 वाजता शेगाव येथील महात्मा गांधी चौक येथून सुरुवात करण्यात आलेला मूक मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक श्री अग्रसेन महाराज चौक रेल्वे स्थानक मार्गी तहसील कार्यालयावर पोहोचला तेथे काही वेळ धारणा दिल्यानंतर मंडळाने तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले.