रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी तब्बल ‘एवढे’ अर्ज!
सरपंच पदासाठी 'इतके' उमेदवार मैदानात

चांगभलं ऑनलाइन | कराड प्रतिनिधी
कराड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेल्या 16 गावामधील सरपंच पदासाठी आज, गुरूवारी दहा अर्ज निवडणूक शाखेकडे दाखल झाले. तर सदस्य पदासाठी 82 अर्ज दाखल झाले.
सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या ग्रामपंचायती आणि दाखल अर्जांची संख्या : रेठरे बुद्रुक 4, सयापूर 1, टेंभू 2, हेळगाव 1, गोसावेवाडी 1, सावरकर 1.
तर सदस्य पदासाठी 10 ग्रामपंचायत साठी 82 उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्याचा तपशील याप्रमाणे – करंजोशी 4, सावरकर 1, बानुगडे वाडी 4, गोसावेवाडी 7, कांबीरवाडी 4, शेळके वाडी (रेवती) 1, येवती 10, रेठरे बुद्रुक 33, सयापूर 7, टेंभू 11, अशी माहिती कराड तहसील कार्यालयाच्या निवडणूक शाखेकडून देण्यात आली.
दरम्यान, रेठरे बुद्रुक, टेंभू, सयापूर, येवती, बानुगडेवाडी या गावांच्या निवडणुकीकडे कराड तालुक्याचे लक्ष लागले आहे.